‘सिस्टम’ फेल आहे, म्हणून आता ‘जन की बात ” महत्वाची — राहुल गांधी

 

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  ‘सिस्टम’ फेल आहे, म्हणून आता ‘जन की बात’ महत्वाची आहे. संकटात देशाला जबाबदार नागरिकांची आवश्यकता आहे. माझी  काँग्रस सहकाऱ्यांना विनंती आहे की, राजकीय कामं सोडून केवळ लोकांना मदत करा, काँग्रेस परिवाराचा हाच धर्म आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.

 

देशात सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी भर पडत आहे. केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी देखील रूग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. एकीकडे देशात दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून, केंद्र आणि राज्य सरकारं लढा देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचं मोदी यांनी सांगितलं. तर, दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधल्याचं दिसून आलं आहे.

 

 

 

 

या अगोदर “केंद्र सरकारला सद्भभावनेने विनंती आहे की ‘पीआर’ व अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्या ऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्यावे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे संकट आणखी गंभीर होईल, याला तोंड देण्यासाठी देशाला तयार करायला हवं. सध्याची दुर्दशा असहनीय आहे.” असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे.

 

ऑक्सिजनचा स्तर घसरू होऊ शकतो, मात्र ऑक्सिजनचा तुटवडा आणि आयसीएयू बेडची कमतरतेमुळे अनेक मृत्यू होत आहे. भारत सरकार ही जबाबदारी तुमची आहे.” असं देखील राहुल गांधी केंद्र सरकारला उद्देशून म्हणालेले आहेत.

Protected Content