पॅरीस (वृत्तसंस्था) सिगारेटमध्ये असणारा निकोटिन या घटकामुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव शकतो, फ्रान्समधल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे.
निकोटिन पेशींना चिकटून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे व्हायरसचा पेशींमध्ये प्रवेशाचा मार्ग बंद होतो आणि करोना शरीरात फैलावण्याचा प्रश्नच उदभवत नाही. निकोटिनचा वापर करण्यामागे ही थिअरी आहे. पॅरिसमधील एका मोठया रुग्णालयात दाखल असलेल्या करोना पॉझिटिव्ह ३४३ रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर संशोधक या निष्कर्षाप्रत आले आहेत. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी, उपचारांमध्ये निकोटिन या पदार्थाचा उपयोग करता येऊ शकतो का? यासाठी फ्रान्समध्ये आणखी काही चाचण्या करण्यात येणार आहेत.