जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सिंधी कॉलनी परिसरातील पायघन हॉस्पिटल समोरून एकाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी १८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, उल्हास नारायण महाजन (वय-४४) रा. निमखेडी शिवार, गुजराल पेट्रोल पंप, जळगाव हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. वॉटर फिल्टरचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी परिसरातील पायघन हॉस्पिटल येथे कामाच्या निमित्ताने दुचाकी (एमएच १९ सीएच ३१४३) ने आलेला होता. त्यावेळी त्यांनी दुचाकी हॉस्पिटलच्या समोर पार्किंग करून लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवारी १८ जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ तुषार जावरे करीत आहे.