बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | बोदवड परिसरात सिंचन योजनेत भुमिसंपादन केलेल्या जमिनीच्या मोबदला मिळण्याबाबत काही शेतकरी बांधव अद्यापही वंचित आहे. तात्काळ मोबदला मिळावा यासाठी शेतकरी बांधवांचे उपोषण सुरू आहे.
बोदवड परिसर सिंचन योजनेत भुमिसंपादन केलेल्या जमिनीच्या मोबदल्यापासून साधारणतः 70 शेतकरी वंचित आहेत. प्रकल्प होण्यापूर्वी आमदगांव, फरकांडे व रोहिणी शिवारात 1978 पासून जमिनी कसत आहेत. या शिवारातील गट नं 238 मधिल मोजक्या शेतकर्यांच्या जमिनी नियमानुकूल झालेल्या आहेत. यांत , बर्याच शेतकर्यांच्या जमिनी नियमानुकूल झालेल्या नसल्याने गत 40 वर्षापासून शेतकरी पायपीट करत आहेत. यासंदर्भात , आमदार चंद्रकांत पाटिल यांनी शेतकर्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकार्यांकडे नोव्हेंबर 2021 मध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ऊपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी बोदवड तहसिलदार यांना दहा दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु , एक वर्ष यावर ठोस कार्यवाही झालेली नाही.
यावर ऊपोषणकर्ते अमोल तायडे, प्रकाश तायडे, विकी घुसळे , केशव सुरवाडे , आनंद बोडवडे , राहुल गुर्चळ, तुळशीराम गुर्चळ यांच्यासहित 33 पुरुष व 15 महिला अश्या एकुण 48 नुकसान ग्रस्त शेतकर्यांकडून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण तहसिल कार्यालयाच्या समोर मांडण्यात आले. न्याय मिळत नाही तोवर धरणाचे काम बंद ठेवावे अशी भुमिका मांडली.
सदरिल ऊपोषणाला आमदार चंद्रकांत पाटिल यांनी भेट देत पुन्हा जिल्हाधिकार्यांकडे बैठक लावण्याच्या सुचना स्विय सहाय्यक प्रशांत पाटिल यांना दिल्या. यात शेतकर्यांसहित संबंधित सर्व विभागाचे अधिकारी ऊपस्थित राहतील असे आमदार चंद्रकांत पाटिल यांनी सांगितल्यावर तहसिलदार शुभम दांडेकर व पोलिस कर्मचार्यांच्या ऊपस्थितीत ऊपोषण स्थगित करण्यात आले.