सिंगापूरमध्ये एका महिन्याच्या लॉकडाउनची घोषणा

सिंगापूर (वृत्तसंस्था) सिंगापूरच्या पंतप्रधान ली सियन लूंग यांनी एका महिन्याच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. हा लॉकडाउन ७ एप्रिलपासून सुरु होणार असून एका महिन्यासाठी देशातील सर्व उद्योगधंदे आणि व्यवहार बंद राहतील. या लॉकडाउनमधून अत्यावश्यक सेवांना वगण्यात आले आहे.

 

अत्यावश्यक सेवा सोडून शाळा, महाविद्यालये आणि अन्य मोठी कामाची ठिकाणे मंगळवारपासून बंद होणार आहेत. कसिनो, थीम पार्कस पुढील आठवड्यापासून बंद होतील. मात्र, खाद्य पदार्थांची ठिकाणे, बाजारपेठा, सुपरमार्केट्स, क्लिनिक्स, हॉस्पिटल, वाहतूक आणि प्रमुख बँकेंच्या सेवा सुरुच राहणार आहेत. जर तुम्ही घरातून बाहेर पडला नाही तर इतरांशी तुमचा संपर्क येणार नाही. यामुळे कोरोनाचा फैलाव थांबेल, असे पंतप्रधान ली सियन लूंग यांनी सांगितले. जगभरात करोना विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या १० लाखांजवळ पोहचली. युरोप या महासाथीमुळे हादरला असून, यापुढील काळ आमच्यासाठी ‘भयानक’ राहील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर अमेरिकेने त्यासाठी तयारी सुरू केली आहे.

Protected Content