जळगाव : प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जिल्हा सरचिटणीस साहिल हाजी मुशीर पटेल यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या सूचनेनुसार वक्ता प्रशिक्षण शहर जिल्हाध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे
साहिल पटेल यांचे पक्षातील कार्य आणि उत्कृष्ट कार्ये शैली पाहता पक्षश्रेष्ठीनी साहिल पटेल यांना पक्ष शहरातील पक्ष बळकटीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्याहस्ते मुंबई येथे १९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस महानगर वक्ता प्रशिक्षण शहर जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले .
यावेळी राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंखे उपस्थित होते. साहिल पटेल यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे .