सावधान : कोरोनाच्या रूग्णसंख्येत अचानक वाढ !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्याने सर्वांनी समाधानाचा सुस्कारा सोडला असतांना दुसरीकडे दोन देशांमध्ये या रोगाचे रूग्ण अचानक मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने याची पुढची लाट येणार की काय ? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाची सुरुवात झालेल्या चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने परत एकदा धोका निर्माण झालेला असतानाच आता चीन पाठोपाठ ब्रिटनमध्येही कोरोना रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसते आहे.

 

ब्रिटनमध्ये एका आठवड्यात कोरोनाच्या केस ७७% ने वाढून १००,००० च्या वर गेल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी अधिकार्याने सांगितल्याप्रमाणे येथे ओमिक्रॉन सबवेरिएंटचा संसर्ग आहे. याचदरम्यान कोविड हॉस्पिटलायझेशनमध्ये आठवड्यामध्ये १२.७% वाढ झाली आहे. मात्र यात रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे कमी असल्याची बाब थोडी दिलासादायक आहे.

यापूर्वी आलेला डेल्टा वेरिएंट हा अधिक धोकादायक होता तर ओमिक्रॉन हा अधिक संक्रमक होता. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर लोक संक्रमित झाले होते. दरम्यान, ब्रिटनसोबत
फ्रान्स, नेदरलँड, डेन्मार्क अशा काही देशांमध्ये देखील कोरोनाने डोकेवर काढले आहे. भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, चीन आणि इतर देशांमध्ये वाढलेली रूग्ण संख्या पाहता काळजी घेण्याची गरज असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Protected Content