सावदा , प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथम लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून शहरात विविध भागातून नगरपालिका कर्मचारी , शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी आपली सेवा बाजवीत आहे. त्यांच्यामार्फेत शहरातील ५० वर्षे वयावरील,० ते १० वयो गटातील बालक व मधुमेह,गंभीर आजार असलेले नागरिक, गरोदर महिला, नागरिकांची थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिमीटरद्वारे लेव्हल व पल्स तपासणी सुरू आहे .
पालिकेने २२ टीमद्वारे तपासणी सुरू असून १ हजार घरामधील ३ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत शेखपुरा मोठा आखाळा , शिवाजी चौक वंजारवाडी , साळी बाग, खाजानगर , गौसिया नगर,मदिना नगर, सोमेश्वर नगर,काझी पुरा, तडवी वाडा, पाटील पुरा या भागात तपासणी करण्यात आली. उर्वरित भागात तपासणी सुरू आहे. ही तपासणीचे कार्य मुख्यधिकारी सौरभ जोशी यांच्या मर्गदर्शनाखाली नगरपालिका कर्मचारी, शिक्षक ,शिक्षिका यांच्या मार्फत सुरू आहे. यात एकूण ३० ते ३२ कर्मचारी सहभागी झाले आहेत. तपासणी करून ज्यांचे पल्स रेट कमी असतील किंवा तापाची लक्षणे असतील त्यांचे १३, १५ व १७ तारखे पर्यंत स्वॅब घेण्यात घेऊन कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी न घाबरत नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी जोशी यांनी केले आहे . आज पर्यंत झालेल्या तसपसणीत कोणीही तसे रुग्ण आढळून आले नाही असे प्रशासनाने प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. याबाबत शहरातील हॉस्पिटलमध्ये सुद्धा रोज नगरपालिके मार्फत अपडेट घेण्यात येत असून दवाखान्यांमध्ये कोणी सर्दी पळसे , ताप व खोकल्याचा रुग्ण आढळल्यास त्याची माहिती सुद्धा मुख्याधिकारी रोज हॉस्पिटल मधून विचारणा करून घेत आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शहरातील सर्व दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश असून संबंधित डॉक्टर यांनी आपले दवाखाना सुरू ठेवावा व दवाखान्यात येणाऱ्या रुग्णास कोणता त्रास आहे याची रोजची माहिती मुख्याधिकारी जोशी यांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.