सावद्यात वृध्दाने उचलले टोकाचे पाऊल

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका ७५ वर्षीय वृध्द व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

 

उखर्डू लालू सराेदे  (वय-७५) रा. सावदा ता. रावेर असे मृत वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उखर्डू सराेदे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. १२ एप्रिल रोजीच्या मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावदा पोलीसांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात मुलगा, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे.

Protected Content