Home आरोग्य सावद्यात कोरोनाचा संसर्ग असलेल्या परिसरात फवारणी

सावद्यात कोरोनाचा संसर्ग असलेल्या परिसरात फवारणी

0
25

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथे कोरोनाचे रूग्ण आढळून आलेला परिसर सील करण्यात आला असून या भागात फवारणी करण्यात आली आहे.

सावदा येथे आजवर कोरोनाचा संसर्ग आढळून आला नव्हता. तथापि, गत काही दिवसांमध्ये शहरात कोरोनाचे दोन रूग्ण आढळून आले आहेत. यातच एका कोरोना बाधीत रूग्ण महिलेचा मृत्यू झाल्याने शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यानंतर आज महावीर चौकात कोरोनाचा संशयित आढळून आला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज शहरातील महावीर चौकात निर्जंतुकीकरण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक राजेश वानखेडे, चारू वानखेडे, कुशल जावळे. प्रदीप ठाकूर, बंटी जंगले यांच्यासह नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound