सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । सावदा येथून स्वॅब सँपल घेतलेले दोन रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले असून यातील एक डॉक्टर तर दुसरा व्यक्ती हा दुसर्या हॉस्पीटलमधील कर्मचारी आहे.
रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये रावेर तालुक्यातील दोघे कोरोना बाधीत असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केली आहे. दरम्यान, या दोन्ही रूग्णांचे स्वॅब सँपल हे सावदा येथून पाठविण्यात आले होते अशी माहिती मुख्याधिकार्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली आहे. यातील एक रूग्ण हा डॉक्टर तर दुसरा रूग्ण हा दुसर्या डॉक्टरच्या हॉस्पीटलमधील कर्मचारी आहे. दोन्हींना होम क्वॉरंटाईन करण्यात आले असून ते सावदा येथील रहिवासी नसले तरी येथून सँपल गेले असल्याने त्यांना सावदा येथील रूग्ण म्हणून दर्शविण्यात आले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या दोन्ही रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
रात्री उशीरा आलेल्या माहितीनुसार संंबंधीत एक कोरोना पॉझिटीव्ह हा तालुक्यातील थोरगव्हाण येथील सरकारी डॉक्टर आहे. त्यांनी कोरोना बाधीत महिलेवर उपचार केले होते. यामुळे ते संसर्गात आल्याची शक्यता आहे. तर दुसरा पॉझिटीव्ह हा मस्कावदसीम येथील रहिवासी असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.