सावद्याच्या सोमवारगिरी येथे एक महिला कोरोना पॉझिटिव्ह ; परिसर सील

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । येथील सोमवारगिरी मंडीजवळ एक 42 वर्षीय महिला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यानंतर प्रशासनाने सोमवारगिरी परिसर सील केला आहे.

आज महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सावदा येथे आता एकूण संख्या 36 झाली असून यात सहा मयत तर 28 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. २ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, याला सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे. आज पॉझिटिव्ह आलेली महिला रुग्ण ही डॉ.उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्यांच्या घरातील पती व मुलगी यांना जे.टी. महाजन कोविंड सेंटरमध्ये क्वारंनटाईन करण्यात आलेले आहे.

Protected Content