सावदा प्रतिनिधी । येथे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठी दिवशी खंडेराव महाराज यांची यात्रा मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येत असते, यावर्षी मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून मंदिरात पूजा करण्यात आली.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी दि. २० डिसेंबर रोजीची यात्रा रद्द करण्यात आली. पण गेल्या ३०० वर्षाची बारागाडे ओढण्यात येत असतात. या वर्षी बारा गाडे ओढण्याचा मान पवार कुटुंबातील सहाव्या पिढीतील राहुल अशोक पवार यांचा होता पण कोरोना मुळे त्यानी फक्त परंपरेनुसार मंदिरातील धार्मिक कार्यक्रम सकाळी आरती, तळी भरणे असे मंदिरातील धार्मिक कार्यक्रमने साजरी केली. कोरोनाच्या नियमांमुळे ३०० वर्षांची बारा गाड्या ओढण्याची परंपरा खंडित झाली असल्याची माहिती भगत देवस्थान संस्थांचे प्रमुख अशोक वसंत पवार व राहुल अशोक पवार यांनी दिली.