सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ११ ते १३ जुलैच्या दरम्यान तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून याबाबत आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत निर्णय घेण्यात आला.
सावदा शहरात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. आजवर ९ बाधित रुग्णांचा मृत्यू पण झाला असून पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ५८ झाली आहे. अशी बिकट परिस्थिती असताना शहरात फिजिकल डीस्टनसिंग चे पालन केले जात नाही. आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात जनता कर्फ्यूची नितांत गरज असल्याने दि.११ ते १३ असा तीन दिवस कडकडीत जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या बाबत येथील विश्रामगृहावर सर्व पक्षीय संघटना व नागरिक यांची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय झाला.
या बैठकीला नगरसेवक, पत्रकार, संघटना, लोकप्रतिनिधी सर्वपक्षीय पदाधिकारी वाढत्या कोरोनाच्या वाढत्या महामारी च्या आलेल्या संकटाला कसे थांबवता येईल यावर विचारविनिमय करण्यासाठी सर्वपक्षीय व संघटनांची बैठक घेऊन नियोजन करण्यात आले.
शहरात कोरोना ने कहर केला आहे. एकमेकांच्या संपर्कातून हा रोग वाढतो आहे. हे प्रमुख कारण टाळायचे असेल तर अशा या बिकट संकटात एकमेकाच्या संपर्कात येऊ नये डिस्टन्सींगचे नियम पाळावे, आपला परिवार व आपल्या गावाची रक्षा आपणच करू शकतो, आपण सर्व मिळून जनता कर्फ्यू लावून गाव बंद करूनच सुरक्षित राहू शकतो त्यासाठी आपण सर्वांनी मिळून नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन ,महसूल प्रशासन यांच्या सहकार्याने नियोजन करून जनता कर्फ्यू पाळण्याची गरज आहे यावर सर्वांचे सहमत झाले.
या अनुषंगाने दि ११ ते १३ असे तीन दिवस शहरात कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत फक्त दवाखाने, मेडिकल दुकाने, दुग्ध व्यवसाय सुरू राहतील.बाकी सर्व दुकाने ,किराणा,भाजीपाला,मोबाईल दुकाने व इतर सर्व दुकाने तीन दिवस संपूर्ण बंद राहतील
जनता कर्फ्यूनंतर दि १४ पासून शहरातील सर्व भाजीपाला फळविक्रेते रस्त्यावरील दुकाने आठवडे बाजारातील खाली ओटयावर सुटसुटीत सोशल डिस्टन्स च्या नियमानुसार विक्री करीत बसतील. येथे फक्त सावदा शहरातीलच भाजी विक्री त्यांना दुकान लावता येईल. कर्फ्यू काळात सर्व किराणा स्टोअर्स भाजी बाजार व फळ विक्री बंद राहील. फक्त दूध मेडिकल हॉस्पिटल सुरू राहतील असा निर्णय घेण्यात आला. जनता कर्फ्यु चे निवेदन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले,मुख्याधिकारी सौरभ जोशी,सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना देण्यात आले. या जनता कर्फुला प्रशासन सहकार्य करेल असे आश्वासन अधिकार्यांनी यावेळी दिले. तर व्यवसायिक व जनतेनेही सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीला बाजार समिती संचालक पंकज येवले, जिल्हा दूध संचालक जगदीश बढे, भाजप शहराध्यक्ष पराग पाटील,शिवसेना शहर प्रमुख मिलिंद पाटील,राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष कुशल जवळे, शरद भारंबे, इलियास टेलर,श्याम पाटील, प्रवीण पाटील,सुरेश बेंडाळे, अरबाज खान, नजीर भाई, विजय पाटील, शरद कस्तुरे, पिंटू धांडे, सतीश बेंडाळे,भाऊ धांडे, किशोर जैन, विजय कानडे, रेवा पाटील, नितीन महाजन, स्वप्नील महाजन,गणेश पाटील, सुहास भंगाळे, गजानन पाटील, रुपेश जैन रुपेश धांडे, प्रकाश नेमाडे, यशवंत वाघुळदे, विकास पाटील,शेख सलीम, प्रमोद चौधरी, अभय निमगले, खंडू वाघुळदे ,भानुदास भारंबे, कैलास लवंगडे,कमलाकर पाटील, पंकज पाटील,आदी उपस्थित होते.