रहिवाशांचा विरोध ; नाल्याचे काम बंद

सावदा ता. रावेर प्रतिनिधी   ।  सावदा येथील स्टेशन नाका जवळून जाणाऱ्या नाल्याचे सुरु असलेले काम स्थानिक रहिवाशांनी आक्षेप घेत बंद पाडले.  

 

सावदा स्टेशन नाका जवळून जाणाऱ्या नाल्याचे काम चुकीचे होत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी आज दुपारी हे काम  बंद पाडले. पावसाळ्यामध्ये सद्यस्थितीची काम चालू होते, त्यामुळे आमच्या आमच्या घरापर्यंत पाणी पोहोचते ते पोहोचू नये म्हणून पश्चिमेकडील नालीचे काम त्या नाल्याच्या तटरक्षक भिंती बांधून पूर्ण करावे.  पश्चिमेकडील मोठ्यात मोठा भाग मोकळा असावा जेणेकरून पावसाळ्याचे पाणी जाताना सहज जाऊ शकेल व परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आज नाल्यातील गटारीचे काम नागरिकांनी बंद पडले. याबाबत मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्याशी भ्रमण दूरध्वनीवरून संपर्क साधला असता लवकरच स्थानिक नागरिकांशी चर्चा करून पुढील नाल्याचे काम सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले

 

Protected Content