सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आ. चंद्रकांत पाटील, आ. शिरीष चौधरी व आ. लता सोनवणे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील, चोपडा मतदारसंघाच्या आमदार लता सोनवणे व रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा शनिवार १४ रोजी संध्याकाळी सात वाजता शहरातील इंदिरा गांधी चौकात करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवलेले क्रीडा शिक्षक अविनाश महाजन यांच्यासह समाजासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचाही सत्कार केला जाणार आहे.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, रावेर तालुका प्रमुख योगिराज पाटील, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, विरोधी पक्ष गटनेते फिरोज खान पठाण, नगरसेवक किशोर बेंडाळे, सिद्धार्थ बडगे, मीनाक्षी कोल्हे, विजया जावळे, नाजीराबी बागवान, माजी नगरसेवक रवींद्र बेंडाळे, विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना शहर प्रमुख मिलिंद पाटील, श्याम पाटील, माजी नगरसेवक लाला चौधरी, युवा सेना जिल्हा संघटक सूरज परदेशी, भारत नेहते, शरद भारंबे, गौरव भैरवा, सुनील पाटील, गणेश माळी, मनीष भंगाळे, नितीन महाजन आदींचे सहकार्य लाभत असून याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.