सावदा प्रतिनिधी । सावदा नगरपालिकेतर्फे कोरोना तपासणी शिबीर घेण्यात आले. यात ३१ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात ४ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. अशी माहिती मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सावदा परिसरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज तपासणी शिबीरात आढळून आलेल्या चार रूग्णांपैकी १ साळी बाग परिसरातील असून इतर ३ जण बाहेगावातील रूग्ण आहे. तपासणी शिबिरात मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे उपस्थितीत कार्यालय अधीक्षक सचिन चोळके, विनय खक्के, धीरज बनसोडे, संदीप पाटील, राजेन्द्र मोरे, आकाश तायडे, जगदीश लोखंडे आदिनि तपासणी शिबिरात नगारिकांचे स्वबे घेतले. पालिकेतर्फे कोरोना तपासणी शिबिर दररोज सुरु असून यात नागरिकांच्या तपासणी केल्या जात आहे अद्याप पर्यन्त शहरातील ७८३ इतर मिळून १३६१ नागरिकांच्या चाचण्या झाल्या शहरात ऐकूण १६९ रुग्ण झाले असून पैकी मयत १० एक्टिवह १९ व बाकी कोरोना वर मात करून घरी परतले आहे शहरात ऐकूण ११ प्रतिबंधित क्षेत्र आहे.