Home धर्म-समाज सावदा येथे इलेक्ट्रीक पोलवर एलीडी लाईट बसवा : राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

सावदा येथे इलेक्ट्रीक पोलवर एलीडी लाईट बसवा : राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

0
24

सावदा, प्रतिनिधी ।  येथील गौसिया नगर,  मदिना नगर, रजानगर पनापीर नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागिल भाग खाली असलेल्या इलेक्ट्रीक पोल वर LED लाईट बसविण्याबाबत यावेत  अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे नगरसेवक व तथा गटनेता फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनाचा आशय असा की,  सावदा नगर परिषदेची नविन हद्दवाढ झाल्यापासून नविन क्षेत्रामध्ये इलेक्ट्रीक पोल व कोणतेही LED लाईट बसवण्यात आलेले नाही. तसेच ज्या ठिकाणी इलेक्ट्रीक पोलची गरज आहे त्याठीकाणी पोल टाकुन LED लाईट बसवावे. तसेच ज्या इलेक्ट्रीक पोल वर स्ट्रीटलाईट कंडक्टर(स्ट्रीट तार) नाही तेथे ते टाकुन मिळावी.  तसेच नविन क्षेत्र हे शेती शिवाराला लागून असल्याने अनेक साप तसेच जंगलीप्राणी यांचावावर असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. मा आमदार  यांच्या आढावा बैठकीत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या म्हणून हे काम त्वरीत करुन मिळावे  अशी विनंती करण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेविका नाजेराबी इस्तीयक बागवान, शकील शे बशीर, इस्माईल युसुफ, कमुद्दिन शे रफिक, नाजिम शे नजीर, शे. नाबीद शे. फिरोज आदींची स्वाक्षरी आहे. 

 


Protected Content

Play sound