फैजपूर प्रतिनिधी । येथील श्री.स्वामिनारायण गुरूकुल इंग्लिश मीडियम शाळेचा दहावी सीबीएसई परिक्षेत ९८ टक्के निकाल लागला आहे. यात ऋतूजा पाटील प्रथम, गार्गी बेंडाळे द्वितीय तर किर्तीराज चौधरी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
याबाबत माहिती अशी की, सीबीएसीई दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर झाला. सावदा येथील श्री.स्वामिनारायण गुरूकुल इंग्लिश मीडियम शाळेचा निकाल ९८ टक्के लागला आहे. या निकाला शाळेतून ऋतूजा गोपाळ पाटील (९६.५०), द्वितीय क्रमांक गार्गी रेवानंद बेंडाळे (९६.१७), तृतीय क्रमांक किर्तीराज नितीन चौधरी (९१.३३) हे आले आहे. तर वैष्णवी विजय सराफ (९०.६७) आणि ऋषी प्रमोद किरंगे (८८.८३) हे अनुक्रमे चौथा व पाचव्या क्रमांकाने आले आहे. या यशवंत विद्यार्थ्यांचे व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष प.पू.स.गु.शास्त्री श्री भक्तिप्रकाश दासजी, उपाध्यक्ष प.पू.स.गु.श्री शास्त्री भक्तिकिशोर दासजी, खजिनदार प.पू.स.गु. शास्त्री श्री भक्तिस्वरूप दासजी, संचालक पी.डी. पाटील व प्राचार्य संजय वाघुळदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.