Home Cities रावेर सावदा येथील नानासाहेब पाटील शाळेचा ९७.५० टक्के निकाल

सावदा येथील नानासाहेब पाटील शाळेचा ९७.५० टक्के निकाल


सावदा ता.रावेर (प्रतिनिधी)। शहरातील श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदीर या शाळेचा निकाल ९७.५ टक्के लागलेला आहे. शाळेतून गुंजन सचिन भंगाळे ९१.४० टक्के प्रथम तर गायत्री पाटील (९१.२०)टक्के मिळवून दुसरी आली आहे.

नगरपरिषद संचलित श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर सावदा या शाळेचा निकाल 97.5 टक्के लागलेला असून कुमारी गुंजन सचिन भंगाळे 91.40 प्रथम, गायत्री प्रवीण पाटील ही 91.20 टक्के मिळवून दुसरी आणि चौधरी एकता प्रवीण ही 90.20 टक्के तृतीय आली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे नगराध्यक्ष अनिताताई पंकज येवले, उपनगराध्यक्ष विश्वास तुकाराम चौधरी, शिक्षण सभापती करुणाताई गटनेते अजयदादा भारंबे व सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषद सावदा मुख्याधिकारी सौरभ जोशी, मुख्याध्यापिका मंगला मधुकर डांगे, पर्यवेक्षक प्रकाश गणु भालेराव व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.


Protected Content

Play sound