सावदा येथील झुलेलाल बायोडिझेल पंप सील

सावदा, प्रतिनिधी  । बायोडिझेल पंप सुरु करण्यासाठी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने लागू केलेले ना हरकत दाखले, प्रमाणपत्र मुदतीत सादर न करू शकल्याने रावेर तहसीलदार यांच्या आदेशानुसार झुलेलाल बायोडिझेल पंप सील  करण्यात आला. 

 

पुरवठा निरीक्षक रावेर व मंडळ अधिकारी सावदा यांनी २३ जुलै २०२१ रोजी  रावेर तहसीलदार यांना झुलेलाल बायोडिझेल पंप तपासून तपासणी अहवाल सादर केला होता. या तपासणीत बायोडिझेल साठवणूक विक्रीसाठी विविध विभागांकडून आवश्यक नाहरकत दाखला, प्रमाणपत्रे पंप चालकाने सादर केल्या नसल्याचे नमूद करण्यात आले होते. यानुसार पंप चालकाला हे  सर्व ११ कागदपत्रे २६  जुलै रोजी तहसीलदारांसमोर सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, पंप चालक  ११ नाहरकत दाखले, प्रमाणपत्र यापैकी एकही दाखला, कागदपत्र सादर करू न शकल्याने  झुलेलाल बायोडिझेल पंप अवैधरीत्या सुरु असल्याचे तहसीलदारांना आढळून आले.  तहसीलदारांनी पुरवठा निरीक्षक रावेर व मंडळ अधिकारी सावदा यांना निरज खेमचंद जसवाणी यांच्या मालकीचा सावदा येथील डायमंड ट्रान्सपोर्टच्या मागे असलेला झुलेलाल बायोडिझेल पंप पंचनामा करून तात्काळ सील करण्याचे आदेश दिले होते. सील उघडून विक्री होतांना आढळून आल्यास पंप चालका विरोधात गुन्हा दाखल करण्याचे तहसीलदारांनी दिले आहेत.

Protected Content