सावदा, प्रतिनिधी । येथे असलेले खंडेराव वाडी मधील खंडेराव देवस्थानाला तिर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाला असून लवकरच विकास काम हाती घेतले जाणार आहे. आमदार चंद्रकांत पाटील व सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांच्या प्रयत्नांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत खंडेराव देवस्थानाला तिर्थक्षेत्र दर्जा देण्यात आला आहे.
खंडेराव देवस्थान ठिकाणी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात ये जा करीत असून त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील व सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी विशेष प्रयत्न करत जळगाव येथे जिल्हा नियोजन भवनात झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत हा मुद्दा लावून धरत निधी खेचून आणला आहे. त्यामुळे सर्व सावदावासी यांसह भावी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे सावदा येथील नागरिकांची भाविकांची अनेक वर्षांची मागणी मार्गी लागली आहे व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात त्यामुळे येथील विकास होणे आवश्यक होते असे मत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी व्यक्त केले.
जिन्सि महादेव मंदीर येथे विद्युत पुरवठा
आज झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये जिन्सि तालुका रावेर महादेव मंदिर येथील मंदिरात विद्युत पुरवठा नसल्याने त्या ठिकाणी भाविक भक्तांचे मोठ्याप्रमाणात गैरसोय होते म्हणून सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी हा मुद्दा पालकमंत्री यांच्या लक्षात आणून दिल्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना आदेश करत जिन्सि येथिल महादेव मंदीरात विद्युत पुरवठा करण्यात यावा असे खडसावले त्यामुळे परीसरातील भाविक भक्त आनंदीत आहे.