यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडेसिम येथे आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य वर्धनी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रयांचे मार्फत वैद्यकीय अधीकारी डॉ. गौरव भोईटे यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य योग शिबीर व बालिका सप्ताह साजरा करण्यात आला.
प्रा.हेमांगीनी सोनवणे, कश्मीरा हुंडीवाले यांनी योग व आरोग्य या बाबत मार्गदर्शन करून योग अभ्यासाचे प्रात्यक्षिके सादर केली. व उपस्थित महिला व विद्याथीर्शी संवाद साधला. सदर कार्यक्रमास तालुका आरोग्य अधीकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी योग व बालिका सप्ताह याबाबत मार्गदर्शन केले. मुलींची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यांपैकी एक असणाऱ्या जळगाव जिल्ह्यात ‘बेटी बचाव बेटी पढावो’ या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
24 जानेवारी 2020 बालिका दिनानिमित्त 20 ते 26 जानेवारी 2020 ह्या कालावधीत बालिका सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, वैद्यकीय अधीकारी डॉ. गौरव भोईटे, डॉ. प्रवीण ठाकरे, प्रवीण सराफ,भूमिका सोनवणे, एल.जी.तडवी, चद्रशेखर फिरके, कल्पेश पाटील, राजेंद्र बारी, बालाजी कोरडे शोभा जावळे, वैशाली चौधरी, जुगरा तडवी, दीपा पाटील, सुरवाडे, मनोज घारू आदी उपस्थित होते. सदर शिबिरात आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस महिला, पुरुष, विद्यार्थी व शिक्षक वुंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.गौरव भोईटे व पथकाने परिश्रम घेतले.