सावखेडा सिम येथील अपात्र लाभार्थ्यांच्या चौकशीचे आदेश

 

 यावल : प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम  येथील घरकुल योजनेच्या बोगस लाभार्थ्यांच्या चौकशीचे आदेश पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत

 

सावखेडा सिम  ग्रामपंचायतीद्वारे मान्यता मिळालेल्या रमाई आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी दिशाभुल करणारी माहीती प्रशासनाकडे सादर केली या  प्रकाराची तक्रार सामाजीक कार्यकर्ते सुनिल भालेराव यांनी केल्याने तिन दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांनी दिले आहे .

 

या संदर्भात सावखेडा सिम येथील सुनिल भालेराव यांनी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश एस .पाटील यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , सावखेडासिम गावातील अभीजीत  साळवे व अशोक साळवे या दोघांचे अद्याप लग्न झालेले नसुन  ते शिक्षण घेत आहे असे असतांनाही या दोघांच्या नांवाने सन्२०१९-२०या वर्षात ग्रामपंचायतच्या वतीने रमाई आवास योजनेचा लाभ घेत आहे . एकत्रीत कुटुंबात राहात असुन त्यांना घरकुलाची गरज काय ? पंचायत समितीच्या माध्यमातुन या दोघांच्या घरकुलांना मान्यता मिळाली कशी हा मुद्दा महत्वाचा आहे .

 

या दोघांचे रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल तात्काळ रद्द करण्यात यावे अशी तक्रार सुनिल भालेराव यांनी केली होती,

या तक्रारीची  दखल घेत गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांनी १९ मार्चरोजी सावखेडा सिम ग्रामपंचायतीला पत्र पाठवुन रमाई आवास योजनेचे लाभ घेणाऱ्या अभिजित साळवे व अशोक साळवे या दोघा लाभार्थ्यांचे रेशनकार्ड वेगवेगळे आहेत का ? त्यांचेकडे स्वताची जागा आहे का ? ते  एकत्र कुटुंबात असतील तर त्यांच्या कुटुंबाने यापुर्वी घरकुल योजनेचा किंवा दुरुस्तीचा लाभ घेतला आहे का  ? याबाबतचा अहवाल तिन दिवसात  पंचायत समितिकडे  गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावा असे म्हटले आहे .

Protected Content