यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील सावखेडासिम येथे सर्पदंशाने मरण पावलेल्या कुटुंबास राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत ७५ हजाराचे धनादेशाचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील सावखेडासिम येथील जिल्हा परिषदेच्या इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणारा आदीवासी विद्यार्थी मयूर संजय तडवी हा त्याचे काकाच्या घरी वावडदा तालुका चोपडा येथे गेला होता. तेथे तो बाहेर खेळण्यास गेला असता. त्याला विषारी सापाने दंश केला. त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाला होता. मयत झाल्यानंतर मयुर संजय तडवी यांनी मुख्याध्यापक नामदेव गंभीर सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून राजीव गांधी अपघात विमा साठी कागदपत्र तयार केलेत. व जिल्हा परिषद जळगावच्या संबंधीत विभागाकडे पाठवले होते. त्यानुसार मयत मयूर तडवी याचे कुटुंबांना ७५ हजार रूपयांचा धनादेश मयत विद्यार्थी मयुर संजय तडवी ची आई यांना देण्यात आले. याप्रसंगी सावखेडासिम जिल्हा परिषदच्या मराठी शाळेचे मुख्याध्यापक नामदेव सूर्यवंशी यांच्या हस्ते व सुनंदाबाई बैसाणे उपस्थिती होते.