मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी येथे मंजुर असलेले शासकीय पशुवैद्यकिय महाविद्यालयाचे काम सुरू करण्याबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला.
यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत नाशिक विभागात जळगाव आणि अमरावती विभागात अकोला येथे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा तत्कालीन वित्त मंत्री यांनी सन-२०१६ मध्ये केली होती. त्यानुसार मुक्ताईनगर तालुक्यात सालबर्डी येथील ३३.७१ आर एवढी जमीन सदर महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांना उपलब्ध करून दिली आहे. हे खरे आहे काय?
तरी या अनुषंगाने सालबर्डी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे शासकीय पशुवैद्यकिय महाविद्यालयाची स्थापना करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे. व लवकरात लवकर पशु वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करावी अशी मागणी आ एकनाथराव खडसे यांनी केली
या प्रश्नाला पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले, ते म्हणाले की, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत नाशिक विभागात जळगाव आणि अमरावती विभागात अकोला येथे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा तत्कालीन वित्त मंत्री यांनी सन २०१६ मध्ये केली आहे. सालबर्डी येथे नियोजित जागत सदर महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांना उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने व महाविद्यालय स्थापन करण्याचा अनुषंगाने पुढील कार्यवाही सुरू आहे.