जळगाव, प्रतिनिधी | महापालिकेच्या सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत सार्वजनीक शौचालय दुरूस्ती व बांधकाम निविदा मागविण्यात आल्या होत्या. यानिविदांमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करून संबधितांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी प्रभारी आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सार्वजनीक शौचालय दुरूस्ती व बांधकामाच्या निविदा बघता त्यामध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे. या प्रकारामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेली मनपाचे आर्थिक नुकसान व जनतेच्या पैशांचा अपव्येय झाल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. तरी या प्रकाराची सवीस्तर चौकशी करून जबाबदार संबधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी छावा मराठा युवा महासंघाने केली आहे.