जळगाव,प्रतिनिधी । सार्वजनिक गणेशोत्सव समितीमार्फत गणेशोत्सव सप्ताह व ऋषीपंचमी निमित्त सामाजिक कार्यक्रमाची सुरूवात आज दि. २३ ऑगस्ट रोजी गौमाता पूजन करून व गाईला चारा टाकून करण्यात आली. यावेळी ३ टन हिरवा चारा पांझरापोळ संस्थेतील गाईंना वाटप करण्यात आला. याप्रसंगी गौशाळेतील ४० स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीव्हीसी ग्लोव्हज व मास्क वाटप करण्यात आले.
या कार्याचा श्रीगणेशा भवानी माता मंदिराचे महेशजी त्रिपाठी व शनिपेठचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या हस्ते गौमातेचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी समिती प्रकल्प प्रमुख हेमंत महाजन, उप प्रकल्प प्रमुख विराज कावडीया, अमित जगताप, अजिक्य देसाई, पवन झुंझारराव, पंकज भावसार, प्रमोद नेवे, धनंजय चौधरी, भरत भोईटे, प्रमोद (बापू) सपके, योगेश वाणी, राजू पेहेलवान, बबलू बारी. तसेच पांझरापोळ संस्थेचे व्यवस्थापक खडके उपस्थित होते.
सार्वजनिक गणेश महामंडळाचे दीपक जोशी, सचिन नारळे, ललित चौधरी, किशोर भोसले, मुकुंद मेटकर, अमित भाटीया यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा उपक्रम राबविण्यात आला. यापुढेही संपूर्ण गणेशोत्सव साप्ताहात समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.