सारांश फाउंडेशनचा समाज भूषण पुरस्कार सोहळा थाटात संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या ७५ वा अमृत महोत्सवानिमित्ताने सारांश फाउंडेशनतर्फे समाज भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

 

जिल्हाधिकारी कार्यालय परीसारतील अल्पबचत भवन येथे सारांश फाउंडेशनच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सामाजिक, वैद्यकीय,शैक्षणिक  क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी आज शुक्रवार दि. २६ ऑगस्ट रोजी समाज भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अल्पबचत भवन येथ करण्यात आले. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तेरा व्यक्तींना समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मुकुंद सपकाळे, नगरसेवक सुरेश सोनवणे, पुरस्कार सोहळ्याचे आयोजक तथा सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा निलु इंगळे, उपाध्यक्ष इंदू मोरे, चंदा इंगळे, शारदा तायडे  रंजना मोरे, अलका उमाळे,  विद्या झनके, शैला पारधे, शोभा इंगळे, संगीता पगारे, लता अहिरे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन हरिषचंद्र सोनवणे  यांनी केले. प्रस्ताविक मुकेश जाधव  यांनी केले.

 

Protected Content