जळगाव प्रतिनिधी । शहरातील पांडे चौकात सायकलने जाणाऱ्या तरूणाच्या हातातील मोबाईल अज्ञात तीन जणांनी दुचाकीने येवून लांबविल्याचा प्रकार गुरूवारी रात्री उशीरा घडला. याप्रकरणी शुक्रवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, उदय विनायक बुवा (वय-३५) रा. वरणगाव ता. भुसावळ ह.मु. रथचौक राममंदीर जळगाव हे खासगी नोकरी करतात. नेहमीप्रमाणे २८ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास कामावरून सायकलने घरी जात असतांना पांडे डेअरी चौक ते नेरीनाका दरम्यान मागून दुचाकीवर तीन चोरट्यांनी हातातील १६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून दुचाकीवरून पळून गेले. त्यांच्या सायकलने पाठलाग केला परंतू तिघे चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रदीप चांडेलकर करीत आहे.