जळगाव प्रतिनिधी । सायकल चालवायला दिली नाही म्हणून चौदा वर्षीय मुलावर चाकूने वार करीत जखमी केल्याची घटना 25 मार्च रोजी सायंकाळी शहरातील धनाजी काळे नगरातील भुरे मामलेदार प्लॉट घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील धनाजी काळे नगरातील भुरे मामलेदार प्लॉट मधील रहिवासी यश सुरेश पवार (वय 14) याला त्यांच्या मागच्या गल्लीतील विशाल नामक मुलाने 5 6 दिवसांपूर्वी सायकल चालवण्यासाठी मागितली होती. परंतु यशने सायकल देण्यास नकार दिल्याने त्या मुलाने यशाला चाकूने मारून बसेल अशी धमकी दिली होती. दरम्यान यश आपल्या मित्रांसह सायकलने जात असताना विशालने यश च्या सायकल समोर त्याची सायकल उभी करीत त्याच्या सायकलवर त्याची सायकल घातली. यश हा त्याचा जाब विचारण्यासाठी गेला असता विशालने त्याच्या हातातील छोट्या चाकूने यशाच्या पोटावर व पायावर वार करीत त्याला जखमी केले. दरम्यान यशाच्या आईने त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. 26 मार्च ला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून विशाल नामक तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ओमप्रकाश सोनी हे करीत आहे.