जळगाव प्रतिनिधी । जिल्हा युवा पिंजारी मन्सुरी समाज मंजूरखॉ बहुउद्देशीय संस्थेतर्फे व जिल्हा मन्सुरी पिंजारी बिरादरीतर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ३७ जोडपी विवाह बंधनात अडकली.
या विवा सोहळ्याला आमदार सुरेश भोळे, माजी आमदार सुरेशदादा जैन, गफ्फार मलिक, करीम सालार, अश्विन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील, एपीआय सचिन बेंद्रे, सुरेश सोनवणे, कुलभूषण पाटील, शोभा बारी उपस्थित होते. विवाह सोहळ्यासाठी जिल्हाध्यक्ष अ. गनी शे. अहेमद पिंजारी, जिल्हा युवक अध्यक्ष अफजल अय्युब पिंजारी, जिल्हा युवा सचिव रफिक अ. रशीद पिंजारी, जिल्हाध्यक्ष अब्दुल गनी शे. पिंजारी व जळगाव जिल्ह्यातील नागरिक यांचे सहकार्य केले. विवाह सोहळ्याच ३७ जोडप्यांना समाजातील दानशूर व सेवाभावी संस्थांकडून भेट वस्तू प्रदान करण्यात आल्या. तर या सोहळ्यामध्ये हजारो समाजबांधव सहभागी झाले होते.