सामाजिक संघटनांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना विविध समस्यांचे निवेदन सादर

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय जनता दल बहुजन भूमी मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त आज जळगाव जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले

राष्ट्रीय जनता दलाचे राज्यनेते प्रशांत बोरकर, बहुजन मुक्ती मोर्चाचे नेते प्रदीप अंभोरे आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद पोहेकर तसेच प्रकाश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर व अन्य तालुक्यातील आदिवासी मागास बहुजन समाजातील वंचित घटकांनी त्याच्या मागण्यासाठी विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने जळगाव जिल्हा सह महाराष्ट्रात लाखो लोकांच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचे मुळे आदिवासी शेतकरी भूमिहीन वनहक्क गायरान, गावठाण  जमिनीवर अतिक्रमण  करून  जीवनजगणारे राहणारे लोकांवर अन्याय होत असून त्या संदर्भात राज्य शासनाने सद्र जनतेची बाजू पुन्हा न्यायालयात मांडावी

तसेच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न नवीन शिष्यवृत्ती योजना सुरू कराव्यात ओबीसी एससी आदिवासी शिष्यवृत्ती योजना मध्ये वाढ करण्यात यावी

जळगाव जिल्हा खानदेश सह विदर्भामध्ये जोडणाऱ्या रेल्वे पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात तसेच गरीब लोकांना धान्य योजनेचा लाभ मिळावा आधी अनेक मागण्यांसाठी आज जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आज निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील,  जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी तसेच उपजिल्हाधिकारी भाग्यश्री भारदे  आदी विविध अधिकाऱ्यांची प्रदीप अंभोरे, प्रशांत बोरकर, प्रकाश वानखेडे, प्रमोद पोहेकर, अनिल बारेलासह असंख्य आदिवासी स्त्री, पुरुष महिला यांनी यांच्या वतीने चर्चा केली.  त्यात शासनाला खानदेश आणि  जळगाव जिल्ह्यातील वंचित घटकांचे प्रश्न वरिष्ठाकडे पोहोचवण्याचे विनंती करण्यात आली.

शासनाने या संदर्भात लवकरात लवकर  दिलासा देण्यासाठी पाऊले उचलावी अशी मागणी करण्यात  आली. या संदर्भात लवकर न्याय मिळाला नाहीतर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आले.  निवेदन देतांना जळगाव जिल्ह्यातील राजद मुक्ती मोर्चाचे असंख्य बहुजन भटके, ओबीसी, मागास, आदिवासी महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content