हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करा : मुस्लिम समाज बहुउद्देशीय मंडळाची मागणी

पाचोरा, प्रतिनिधी  । दिल्ली येथील साबिया सैफीची  क्रूर हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई अशी मागणी मुस्लिम समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे पोलिस प्रशासनास निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की,  साबिया शमीम सैफी रा.संगम विहार, दिल्ली ही मुलगी दिल्ली सिव्हील डिफेन्स विभागातील डी. एम. दिल्ली (दक्षिण) कार्यालय येथे नोकरीस होती. अतिशय विभत्स अवस्थेत क्रुरपणे हत्या केलेला तिचा मृतदेह सुरजकुंड, दिल्ली येथे आढळून आला आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला अटक झालेली आहे. परंतू सोशल मिडीयावर व न्युजमध्ये प्रसारण झालेल्या माहितीवरुन या क्रुर हत्येमागे मोठे षडयंत्र असल्याचे दिसुन येते. मयत मुलगी ही फक्त २१ वर्षांची होती व ती नुकतेच चार महिन्यांपुर्वी नोकरीवर हजर झाली होती. मिडीया व न्युज च्या माध्यमातून प्रसारीत झालेली माहिती अशी की, तिचे अपहरण करुन सामुहिक बलात्कार केले व तिची क्रुरपणे हत्या केली गेली. मानव जातीला अशोभनीय असा हा गुन्हा अतिशय क्रुरपणाचा कळस गाठणारा आहे. या गुन्ह्याची दिल्ली येथे एफ.आय.आर. नोंदविली गेली आहे. या गुन्ह्याची चौकशी सी. बी.आय. मार्फत करण्यात यावी, सदर केस हा फाक्टट्रॅक कोर्टात व डे टु डे चालविण्यात यावा, गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, क्रुरपणे हत्या झालेल्या सिव्हील डिफेन्स विभागातील साबीया सैफी च्या कुटूंबियांना तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी. अशा आषयाचे निवेदन मुस्लिम समाज बहुउद्देशीय मंडळ, पाचोरा तर्फे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना देण्यात आले आहे. निवेदनावर सईद शब्बीर शेख, जमिल खान बशिर खान, सय्यद गफ्फार सय्यद गयास, शेख सलिम शेख नईम, हमिद खान राजे खान, लतिफ खान शब्बीर खान, आसिफ खान शरीफ खान, शेख नदीम शेख नसिर, अनिस खालिक शेख, सलिम शहा सुभान शहा, मेहमुद खान आमद खान, शेख जावेद शेख फरीद, सै. शकिल सै. लाल, मुश्ताक शब्बीर मलिक, इसा शेख अजिज, शेख शरीफ खाटीक यांच्या सह्या आहेत.

 

Protected Content