साफसफाई कर्मचारी आणि अग्निशमन दलासोबत धर्मरथ फाउंडेशने केली दिवाळी साजरी

जळगाव, प्रतिनिधी | लक्ष्मीपूजन दिवाळी निमित्ताने धर्मरथ फाउंडेशने साफसफाई कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांना सोबत गळ्या वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.

 

ज्या गटर कामगार सण न पाहता नियमितपणे गटर, कचरा साफसफाई आणि अग्निशमन दल कर्मचारी नेहमी काम करत असतात. यानिमित्ताने यांनी त्यांच्या काम करण्याची पद्धती आणि त्यांना होणारा त्रास पाहता व अग्निशमन दल रोज धूळ उडू नये म्हणून नेहमी पाणी रोडवर मारतात. त्यांचे ही धर्मरथ फाउंडेशन परिवाराने आभार मानले.

 

दिवाळी निमित्ताने धर्मरथ फाउंडेशन परिवाराने यंदा त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली. त्यांना मिठाई व फराळ देऊन शुभेच्छा आणि धन्यवाद मानले. त्यावेळी शुभेच्छा देताना धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील, संतोष भिंताडे, धनंजय चौधरी, मिलिंद बडगुजर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Protected Content