साने गुरूजी उच्च माध्यमिक विद्यालयात देवयानी पाटील व मानसी बारी प्रथम

यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  येथील यावल नगर परिषद व्दारे संचलीत एच एस सी परीक्षेत सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे एचएससीच्या परिक्षेत नेत्रदीपक यश संपादीत केले आहे .

 

सन २०२२ – २० २३ या वर्षातील फेब्रुवारी /मार्च २०२३ च्या एच. एस. सी. परीक्षेमध्ये साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९९ .४१ %  तर वाणिज्य विभागाचा निकाल हा ९८ .९३ % व कला शाखेचा निकाल ८७ .९५.% लागलेला आहे.

 

यामध्ये विज्ञान  शाखेची विद्यार्थिनी बारी मानसी विश्वनाथ हिने ( ५२५) ८७ .५० % मिळून प्रथम क्रमांक, तर कुलकर्णी शैलेश श्रीवल्लभ या विद्यार्थ्याने ( ५१७) ८.१७% गुण मिळवून द्वितीय क्रमांक ,व पाटील  दीप्ती रवींद्र या विद्यार्थिनीने ( ५१५) ८५ .८३% मिळून   तृतीय क्रमांक मिळविला .वाणिज्य विभागातून बडगुजर स्नेहा प्रमोद ( ४६७) ७७ .८३ % मिळून  प्रथम क्रमांक ,पाटील प्रणाली अजबराव( ४५९) ७६.५०% द्वितीय क्रमांक, तर ढाके जयश्री सुकलाल( ४५५) ७५.८३% तृतीय क्रमांक मिळविला. कला शाखेतून पाटील देवयानी धनंजय ( ४९८) ८३ .००%मिळून प्रथम क्रमांक ,तर काटोले लकिशा प्रकाश( ४८६)  ८१ .००% मिळून द्वितीय क्रमांक व नगरे स्वरूप मिलिंद( ४५८)  ७६ . ३३ % मिळून तृतीय क्रमांक मिळविला.

 

विद्यालयातील या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य एम के पाटील सर्व पदाधिकारी तसेच शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

Protected Content