अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सात्री गावाला पर्यायी रस्ताच्या कामाला गती मिळत नसल्याने ग्रामवस्थे महेंद्र बोरसे यांनी जलसमाधी घेणेबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, बऱ्याच वर्षापासून सात्री येथील महेंद्र बोरसे यांनी गावाला पर्यायी रस्ता मिळावा, पुनर्वसन संदर्भ समस्या सुटाव्या, पावसाळ्यात नदीला पाणी आले तर सात्री गावाचा तालुक्याचा संपर्क तुटतो. पावसाळ्यात आजारी रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. बऱ्याच वेळा शासनाला याबाबत पत्रव्यवहार केले. मागील वर्षी वेळेवर एका शाळकरी मुलीला वेळेवर उपचार मिळाले नाही तीचा जीव गेला. यावर्षीही नदीला पूर आला असताना एका महिलेला वेळेवर उपचार मिळाल्याने तिचा मृत्यू झाला होता. गांव तेथे रस्ता मात्र स्वातंत्रनंतर अजूनही याठीकाणी रस्ता नाही. सात्री गावाच्या पर्यायी रस्त्याला गती मिळत नाही. पुरपरिस्थितीत पर्यायी रस्ता नसल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने मयताच्या वारसाना मुख्यमंत्री सहायता निधीतून सहायता मिळाली नाही, पुर्नवसन गावठाण मधील भूखंड वाटप बाबत शासन स्तरावर प्रलंबीत असलेल्या प्रस्तावाला मंजुर मिळत नसल्याने प्रशासनाची उदासीनता यातून दिसून येत आहे. या अनुषंगाने सात्री ग्रामस्थ शासनाच्या कुंभकर्णी झोपेला जागे करण्यासाठी येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी निम्न तापी प्रकल्प पाडळसरे येथील जलसाठ्यात ग्रामस्थांना सोबत घेऊन जलसमाधी घेऊ अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थे महेंद्र बोरसे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.