मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा– एसटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाची धुरा सांभाळणारे अड्. सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आर्थर रोड तुरुंगात असलेल्या अड् सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी मिळताच सातारा पोलिसांनी दीड वर्षापूर्वी दाखल गुन्ह्याचा चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
दीड वर्षापूर्वी एका खाजगी चॅनेलला मराठा आरक्षणसंदर्भात खा. उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याविरुद्ध मुलाखतीत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यासंदर्भात समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात सातारा येथील राजेंद्र निकम याच्या तक्रार दिली होती. त्यावरूनच ऑक्टोबर २०२० मध्ये सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदावर्ते यांना सातारा शहर पोलिसांनी वारंवार चौकशीला बोलावून देखील ते गैरहजर राहिले आहेत.
तर गेल्याच आठवड्यात एसटी कर्मचाऱ्यानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवास्थानावरील हल्ला केल्याप्रकरणी अड्. सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. यानंतर मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात दीड वर्षापूर्वी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात सदावर्तेंच्या चौकशीसाठी त्यांचा ताबा देण्यात यावा अशी मागणी सातारा पोलीसानी गिरगाव न्यायालयात केली होती. त्यानुसार गिरगाव न्यायालयाने सातारा पोलिसांना १७ एप्रिलपर्यंत सदावर्तेंचा ताबा दिला असून सातारा पोलीस सदावर्तेना चौकशीसाठी घेऊन गेले आहेत. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.