यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहिता घराच्या ओट्यावर झोपलेली असतांना एकाने साडी ओढून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, यावल शहरातील एका भागात विवाहिता २८ मे रोजी मध्यरात्री घराच्या ओसरीत खाटेवर झोपली असता रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गावात अंकुश गोविंदा कोळी याने झोपेत असता आपली साडी ओढून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महीलेच्या लक्षात आल्याने तिने आरडाओरड केल्याने छेडखानी करणाऱ्याने पळ काढला.
याबाबत महीलेने यावल पोलीस ठाण्यात अंकुश कोळी याच्या विरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे. या गुन्ह्यातील संशयीत आरोपीस अंकुश कोळी यास पोलीसांनी अटक केली आहे.