पारोळा, प्रतिनिधी । येथील सागर कम्प्युटर सेंटर च्या वतीने विद्यार्थी व तरुणांसाठी करियर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यात विविध क्षेत्रातील व्यवसाय संधी सोबत भारतीय सैन्य दलातील नोकरीविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
करिअर मार्गदर्शन करतांना नेटवर्क इंजिनियर संदीप माळी यांनी विद्यार्थी व तरुणांना विविध क्षेत्रातील ग्लोबलायजेशन नेटवर्किंग,तंत्रज्ञान, विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी बाबत मार्गदर्शन केले. संदीप माळी यांनी बावीस देशात अनेक विविध कंपन्यांमध्ये नेटवर्किंग इंजिनियर म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तरुणांना अनेक संधी उपलब्ध असून याविषयी मोलाचं मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांकडून प्रतिक्रियाही जाणून घेतल्या.
तसेच कॅप्टन हिम्मतराव पाटील यांनीही सैनिकी प्रशिक्षण व विविध भारतीय सेना दल यांविषयीच्या नोकरीच्या संधीबाबत माहिती दिली. सेना दलाच्या भारतीसाठी आवश्यक असणारी तयारी, शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले. मोनाली मोराणकर यांनी विद्यार्थिनींसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन सागर कम्प्युटरचे संचालक पी. एस. माळी यांनी केले होते. नेटवर्क इंजिनियर संदीप माळी यांनी सागर कॉम्प्युटरचा गौरव करताना सांगितले की, अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन आज-काल व्यवसायिक संस्था करत असतात., परंतु सागर कम्प्युटर ही संगणक शिकवणारी संस्था सामाजिक जाणिवेतून विद्यार्थी व तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम घेते ही खरंच उल्लेखनीय बाब आहे आणि त्याबद्दल त्यांनी पी. एस. माळी सर यांचे अभिनंदन केले. वैभव शिरोळे संतोष महाजन, सोपान पाटील,समाधान सरदार, राजाराम शिंपी, विद्यार्थी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.