साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर रात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शासनाच्या रूग्णवाहिकेतील एक महिला डॉक्टर जागीच ठार झाली असून चालक गंभीर जखमी झाला आहे.
राज्य शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेला (एमएच १४, सीएल ०८०१) रात्री अकराच्या सुमारास साकेगावजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात डॉ. अंशुला पाटील (रा. भुसावळ) या जागीच ठार झाल्या असून रूग्णवाहिकेचा चालक समाधान अनिल पाटील (वय २७, रा.भुसावळ) हा गंभीर जखमी झाला आहे. रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला रूग्णालयात दाखल करत वाहतूक सुरळीत केली.