यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सांगवी खुर्द या गावात तरुणाने शेतात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.श्
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथील राहणाऱ्या घनश्याम सोपान कोळी वय३६ वर्ष यांनी सोमवारी १९ डिसेंबर रोजी अट्रावल शिवारातील सुभाष चौधरी यांच्या शेत बटाईने केलेल्या शेतात ते सकाळी गेले असता. घनश्याम कोळी यांनी शेतालगतच्या असलेल्या बोरीच्या झाडाला दोरीच्या साह्याने हा विवाहीत तरूण गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळुन आला. सदर प्रकार शेतात कामास गेलेल्या उपस्थित शेत मजुरांच्या निदर्शनास आला व त्यांनी तात्काळ कोळी यांच्या कुटुंबांना सदरची माहिती क्लली. तेव्हा मजुरांच्या सहाय्याने तात्काळ घटनास्थळावरून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
यावेळी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण, डॉ.सचिन देशमुख यांनी तपासणी अंती कोळी यास मृत घोषित केले. मयत घनश्याम कोळी यांच्या पक्षात आई-वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.या विवाहीत तरूणाने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र कळु शकले नाही. या संदर्भात रामकृष्ण भागवत कोळी यांनी यावल पोलिसात घटनेची खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन, घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अजीज शेख करीत आहे.