कवठेमहांकाळ । सांगली जिल्ह्यात राजकीय नेत्यांचा खूनाचे सत्र सुरूच आहे. चार दिवसांपुर्वी एकाची हत्या करून खून करण्यात आला होता. आज देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडली आहे.
राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती होते. देशींग गावाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करत हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. राजकीय वैमनस्यातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते युवराज पाटील यांचा खून झाला होता. त्या प्रकरणात संशयित म्हणून मनोहर पाटील यांचं नाव पुढं आलं होतं. त्यांच्या खुनाचा युवराज पाटील हत्येशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. चारच दिवसांपूर्वी पलूस येथे राष्ट्रवादीचेच एक नेते आनंदराव पाटील यांचा खून झाला होता. त्या प्रकरणाचा छडा अद्याप लागलेला नाही. असं असतानाच पुन्हा एक खून झाला आहे. लागोपाठच्या या हत्यासत्रामुळं पोलिसांवरील दबाव वाढला आहे.