यावल, प्रतिनिधी | येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार भास्कर वामन पवार हे आपल्या ३६ वर्षाच्या सेवेतुन आज सेवानिवृत झाले असुन त्यांना अत्यंत साध्या पद्धतीने आपल्या पोलीस दलातील रुहकार्यानी भावपुर्ण निरोप दिला.
यावल पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार भास्कर वामन पवार हे मुळ भुसावळ येथील राहणारे असुन त्यांनी १९८४ या वर्षी योलीस दलात आपल्या सेवेला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी जळगाव येथुन नंतर रावेर, कासोदा, यावल या पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी विविध ठीकाणी आपली सेवा बजावली व दिनांक ३१ मे रोजी नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले. कोरोना संसर्गाच्या संकटात त्यांना पोलीस स्टेशनच्या आवारात आपल्या सहकार्यानी निरोप दिला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे विशेष काटेकोर पालन करण्यात आले. याप्रसंगी यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, पोलीस उपनिरीक्षक जितेन्द्र खैरनार, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर, सहाय्यक फोजदार मुज्जफ्फर खान पठान, फौजदार अजीज शेख, पोलीस कर्मचारी संजय तायडे, नितिन चव्हाण, गौरख पाटील, अस्लम खान, नेताजी वंजारी यांच्यासह आदी पोलीस कर्मचाऱ्यानी त्यांना सेवानिवृतीपर निरोप दिला. यावेळी पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या हस्ते भास्कर पवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवुन सत्कार करण्यात आला.