
जालना वृत्तसंस्था । पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक फौजदार सुभाष गायकवाड यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

गायकवाड हे आज सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले होते. त्याचवेळी शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) अभय देशपांडे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, संजय लोहकरे, यशवंत जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले . आत्महत्येचे कारण लगेच समजून आलेले नाही.


