चाळीसगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि सर्वन्यायी असून यामुळे प्रगतीच्या संधी उपलब्ध होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत आ. चव्हाण म्हणाले की, अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकारने पावले टाकली आहेत. या वर्षात देशाचा जीडीपी १० टक्के राहील असा अंदाज वर्तवत, प्राप्तिकर रचनेत सामान्यांना दिलासा मिळेल असे निर्णय घेतले आहेत. कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद, मुद्रा योजना कृषी क्षेत्रातही लागू करण्याचा निर्णय आहे. झिरो बजेट शेतीला सरकार प्राधान्य देणार आहे. खर्या अर्थाने मोदींजींच्या स्वप्नातील भारताची नवनिर्मिती, सुदृढ अर्थव्यवस्था निर्मितीचा उद्देश साध्य होणार असल्याचे प्रतिपादन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले आहे.