सरदार वल्लभभाई पटेल स्कुलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे समानता आणी सत्यसाठी देह झिजवणारे बहुजनांचे उद्धारक व सत्यशोधक समाजाचे संस्थापक थोर समाजसेवक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावल येथील श्री मनुदेवी शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये थोर समाजसेवक महात्मा ज्योतीबा फुले याची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने स्कुल मध्ये आयोजीत कार्यक्रमात सर्व प्रथम सौ .कुंदा नारखेडे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमे चे पूजन करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येवुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे संस्थाध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच स्कुलच्या मुख्यध्यापिका सौ .शिला तायडे व प्रशांत फेगडे यांच्यासह स्कुलचे सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग या वेळी कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते .

Protected Content