सरदार एस. के. पवार विद्यालयाचे ३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

पाचोरा, प्रतिनिधी  । तालुक्यातील नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे ३ विद्यार्थी राष्ट्रीय परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या एन.एम.एम.सी.ई परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

 

राष्ट्रीय परीक्षा परिषद, नवी दिल्ली (एन.सी.ई.आर टी.) यांचे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा  (एन.एम.एम.सी.ई.) घेतली जाते.  सन २०२० – २१  मध्ये घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस. परीक्षेच्या गुणवत्ता यादीत सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा  येथील इयत्ता आठवीचे ३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहे. गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना  इ. ९ वी ते १२ वी पर्यंत प्रतिवर्ष प्रत्येकी १२ हजार रुपये म्हणजे चार वर्षात एका विद्यार्थ्यासाठी ४८ हजार रुपये मिळतात. यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खूप मोठी आर्थिक मदत होते. विद्यालयातील एकुण १५ विद्यार्थी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ५ विद्यार्थी पास झाले असून  यातील ३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकविले आहे.  ५ वर्षांपासून एन. एम. एम. एस. परिक्षेत गुणवत्ता यादीत स्थान कायम ठेवण्याची परंपरा या विद्यालयाने यावर्षी देखील सुरू ठेवली आहे.

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी 

जितेंद्र प्रदीप सैंदाणे – इयत्ता – ८ – (९९ गुण), भारद्वाज भावसिंग पाटील – इयत्ता – ८ वी (८३ गुण), नंदिनी किशोर महाजन – इयत्ता ८ वी (८२गुण) या यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामशिक्षण समितीचे चेअरमन आर. डी. शिरुडे, व्हा. चेअरमन एस. एम. थेपडे, सचिव एस. डी. जाधव, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य व्ही.बी.बोरसे, उपप्राचार्या ए. बी. साळुंखे, पर्यवेक्षक वाय. डी. ठाकूर, ए. सी. आमले,  शिक्षक – शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना शाळेतील मार्गदर्शक शिक्षक तसेच परीक्षा समन्वयक निखिल प्रकाश शिरुडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content