मुंबई (वृत्तसंस्था) सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, मला स्वतःला या सरकारबाबत कोणतीही शंका नाही. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. सरकारचं नेतृत्व ज्यांच्या हातात आहे, ते सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत आणि दुसऱ्यांच्या कामात ते अजिबात हस्तक्षेप करत नाहीत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले आहे.
‘एबीपी माझा’च्या एका शरद पवार यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून दिले. सरकारचे काम व्यवस्थित सुरू आहे. सर्व नीट चालू आहे. त्यामुळे आता मी लांब झालो. या सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही. तसेच जुन्या सरकारचे काही निर्णय बदलले, त्याचा राज्यावर विशेष परिणाम होईल असं वाटत नाही, असेही ते म्हणाले. ‘शिवसेना म्हणून आमचा कधी संपर्क आला नाही, पण बाळासाहेब ठाकरेंसोबत मित्र म्हणून खूप संपर्क होता. त्यांनी एखादा शब्द दिला तर तो शब्द ते पाळायचे. काँग्रेसचे निर्णय दिल्लीमध्ये होतात. आज काँग्रेसने निर्णय घेण्याचा पद्धतीत बदल केला असून सहकार्य करायचे, सरकार टिकवायचे ही भूमिका काँग्रेसमध्ये दिसत आहे,असेही शरद पाववर म्हणाले.