मुंबई (वृत्तसंस्था) सरकारी नोकरीत अनुसुचित जाती-जमातींसाठीच्या आरक्षणानुसार बढती देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
विधानपरिषदेचे आमदार हरिसिंह राठोड यांनी सरकारी नोकरीच्या बढतीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्षवेधी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी सांगितले की, हरिसिंह राठोड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नमूद असतानाही राज्यात सरकारी नोकरीत बढतीमध्ये आरक्षण दिले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सरकार लवकरच मागासवर्गीयांना आरक्षणनुसार पदोन्नती देईल. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, असेही ठाकरे म्हटले.